तुला समजल नाही 
पण येवढ तरी बरं होतं 
तुझं नाही पण निदाण 
माझं प्रेम तरी खरं होतं
----------
तुला माझं म्हणता म्हणता
मीच तुझा होवुन गेलो
आपण दोघ म्हणता म्हणता
मी एकटाच राहुन गेलो
----------
प्रत्येकाला जगण्यासाठी
काहीतरी लागतं
माझंही ह्रुदय धडधडण्यासाठी 
तुझी एक नजर मागतं
 
----------
तु जर मला पुष्कळ
आधी भेटली असती 
तुझ्या सोबत तुझी 
सावलीही जपुन ठेवली असती
----------
डोळ्यांना डोळ्यांची भाषा कळते 
डोळे मिटल्यवरही त्यांना स्वप्नांची आवड जडते
भाव कळल्यावरही पाणावनं त्यांच
ह्या डोळ्यांच त्या डोळ्यांसाठीच असते 
 
----------
आज तुझ्या आठवणींच्या 
असंख्य सुया टोचल्यात
माझ्या कविता पुन्हा 
मी नव्याने वाचल्यात
----------
काळजाच्या कोपरयात
आजही तु असतेस 
हातांच्या रेषांवर 
हळुचं हसतेस 
----------
पाऊसात तुला भिजतांना पाहीलं 
पाऊसाला असं पहील्यांदा जळतांना पाहीलं
केसांना तुझ्या वारयावर उडतांना पाहीलं 
तुझ्या डोळ्यात उसळणारया माझ्या भावनांना पाहीलं
----------
ती येते म्हणाली होती.
वाटेवर डोळे लाऊन होतो.
मान्सून येण्याआधीच,
मातीचा सुगंध घेत होतो.
----------
तू येउन गेलीस,
पण जाताना मात्र,
आठवंनीच्या गुलमोहराखाली,
सावलीच विसरून गेलीस.
----------